जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२५
यावल तालुक्यातील पाडळसा या गावात एका घरात वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम सुरू होते. यासाठी भिंतीत छिद्र पाळण्यात आले होते. तेथे खिळा ठोकतांना एका २२ वर्षीय तरुणाला विद्युत शॉक लागला आणि तो जमिनीवर कोसळला तातडीने त्याला भुसावळ येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण हा सावदा शहरातील रहिवासी होता.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील पाडळसा या गावात सुधाकर ओंकार चौधरी यांच्या घरी वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम सुरू होते. या कामासाठी ड्रिल मशीनद्वारे त्यांच्या घरात छिद्र करण्यात आले. ठिकठिकाणी केलेल्या शिद्रा दरम्यान अंडरग्राउंड केलेली इलेक्ट्रिकल वायर कुठेतरी कट झाली आणि छिद्र पाडलेल्या ठिकाणी तौफीक खान अश्रफ खान (वय २२ रा. रविवार पेठ, सावदा ता. रावेर) हा खिळा ठोकत असतांना त्याला जबर विद्युत शॉक लागला व तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तातडीने उपचाराकरिता भुसावळ येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष चौधरी करीत आहे.




















