जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १-ब मधील अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. त्यांच्या समर्थनार्थ जळगाव शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ‘गोल्डमॅन’ सागर सपके यांनी थेट प्रचाराच्या मैदानात उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
चेतन महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीत सागर सपके यांनी नागरिकांशी संवाद साधत अपक्ष उमेदवार चेतन महाले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. खडके चाळ ते राजमालती नगरपर्यंत ही प्रचार मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली.
या प्रचार फेरीत परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, राजेंद्र सोनवणे, सुरेश ठाकरे, प्रभाकर खर्चे, जगन्नाथ जाधव, शाम वाघ, प्रशांत मांडोळे, गणेश सपके, किरण नेरकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या भव्य उपस्थितीमुळे प्रभाग १-ब मधील निवडणूक वातावरण अधिक तापले असून, अपक्ष उमेदवार चेतन महाले यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.




















