जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२६
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय किशोर दराडे यांच्या वतीने भुसावळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयास आधुनिक प्रोजेक्टरची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमास आमदारांचे विभाग समन्वयक आप्पासाहेब (संभाजी) पाटील, भुसावळ शिक्षक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, आमदारांचे स्वीय सहायक हरीश मुंढे, जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदारांचे कार्यालयीन समन्वयक सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे, पर्यवेक्षक शशिकांत रायसिंग यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार किशोर दराडे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीही आमदार दराडे यांनी या विद्यालयास संगणक व प्रिंटर भेट देऊन डिजिटल शिक्षणासाठी मोलाची मदत केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.




















