जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२६
बी. यू. एन. रायसोनी स्कूल, सी. बी. एस. ई. पॅटर्न, प्रेमनगर, जळगाव येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीष रायसोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सामूहिक संविधान पठण करून संविधानप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
यानंतर नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून भारताच्या बहुसांस्कृतिक व बहुभाषिक स्वरूपाचे दर्शन घडवले. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान शाळेचे अध्यक्ष तसेच पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते नर्सरी ते इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्ध्विका मराठे, अनमोल कुमार व कृष्णा जांगीड या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे उपाध्यक्ष श्री. उमेदजी रायसोनी व मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




















