
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डांभूर्णी येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की,तालुकयातील डांभूर्णी येथील अर्चना कोळी या पती, मुलगा आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला आहे. आज बुधवार. दि.२७ रोजी दुपारी घरी कुणीही नसतांना अर्चना कोळी यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.मुलगा दुपारी शाळेतून घरी आल्याने घराचा दरवाजा आतून बंद होता. बंद दरवाजा उघडताच आईने आत्महत्या केल्याचे दिसून आले. आईचा मृतदेह पाहून रडत वडिलांच्या शोधात गेला. दरम्यान पती राजेंद्र कोळी हे घराकडे धाव घेतली. विवाहितेने आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतदेह खाली उतरवून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले.” विवाहितेच्या पश्चात दोन लहान मुली व एक मुलगा, पती आणि सासरे असा परिवार आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















