
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा बुधली धरणावर पोहतांना बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी सायंकाळी उघडकिस आली आहे.
सायंकाळी मुलाचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, समता नगर परिसरातील अमोल ज्ञानेश्वर भालेराव(वय-१५) हा आई, वडील आणि लहान भाऊ याच्यासह राहायला आहे. अमोल हा दहावीचे शिक्षण करतो. गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी मित्रांसह तालुक्यातील शिरसोली प्र.बो. शिवारातील बुधली धरणावर पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहतांना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला उपस्थित नागरीकांच्या मदतीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी जमली होती. मयत अमोलचे वडील हे महापालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात.





















