
लोहारा ता. पाचोरा : प्रतिनिधी
परिसरात कधी रिमझिम तर कधी मध्यांन स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे मात्र या रिमझिम पावसाने अनेक वेळा जनजीवन विस्कळीत झाले त्याचा परिणाम रस्त्यांवरही झाला यामध्ये परिसरातील अनेक रस्त्यांची दाणादाण उडून खड्डेमय झालेले आहे. यामुळे माध्यमातून अधून-मधून रस्त्यांच्या विदारक परिस्थितींवर प्रकाशझोत टाकला जातोय.
सतत होत असलेल्या पावसाने व वाहतुकीने रस्त्यांवरील मुलामा,खडी निघून खड्ड्यांनी रस्त्याला चाळणीचे रूप आलेले यात लोहारा बसस्थानक रस्ता व परिसर याचीही गणना होईल याला अपवाद म्हणून एकही रस्ता शिल्लक राहिलेला नाही एखादा जास्त प्रमाणात झाला नसेल तर तो कमी प्रमाणात अशाच प्रकारे लोहारा बस स्थानक आवारालाही खड्ड्याचे ग्रहण लागलेले असून बसस्थानक मार्गालाही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून काही प्रमाणात असलेला रस्ताही खराब होऊ पाहतोय.
खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले असल्याने बसस्थानक रस्ता किती वर्षापासून खडीकरण, डांबरीकरण झालेला नाही असं प्राथमिक पाहिलं तर संबोधुन कोणीतरी बोलणार अशा परिस्थितीचे चित्र आता बघायला मिळत आहे बस स्थानक परिसर म्हटला तर अतिशय वर्दळीचा असतो परिणामी छोटे-मोठे पडलेले खड्डे वाहतुकीने मोठे होणारच यामुळे पावसाची उघडीत मिळताच बसस्थानक आवार परिसर रस्त्याला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुगीचे पुरण देण्याची नितांत गरज आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते.




















