
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एक नर जातीचे हरीण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असुन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी जावुन मृत्युमुखी पडलेल्या हरीण ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा ते मोढांळे रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्या जवळ दि. २९ जुलै रोजी मध्यरात्रीच्या वेळी एक नर जातीचे हरीण रस्ता क्रॉस करत असतांनाच कोणत्यातरी अज्ञात वाहनाने हरीणास जोरदार धडक दिली. या धडकेत हरीण हे मृत्युमुखी पडले. दरम्यान घटना स्थळावरुन मोढांळे येथील युवक सुकलाल पाटील व राहुल जाधव हे घराकडे जात असतांना त्यांना मृत्युमुखी पडलेले हरीण दिसताच त्यांनी त्वरीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचुन त्यांनी पंचनामा करत हरीण ताब्यात घेतले. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने सुकलाल पाटील व राहुल जाधव यांनी दाखविलेल्या तत्परतेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.




















