
जळगाव मिरर | १० मार्च २०२६
शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १० मार्च) भाजप कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमाताई भोळे तसेच भाजपा प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. महिलांचे शिक्षण, सामाजिक समता आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली.
कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी उदय भालेराव, दीपक परदेशी, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ललित बडगुजर, सचिन बाविस्कर, विजय वानखेडे, प्रकाश पंडित, पंकज जैन, आशिष सपकाळे, सुरेश सोनवणे, किरण भोई, दिलीप लाडवंजारी, रेखा वर्मा, वंदना इंगळे, भाग्यश्री चौधरी, माधुरी हांडे, रोहित सोनवणे आदी उपस्थित होते.
तसेच मंडलाध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, अतुल बारी, संदीप धंधोरे, महेश पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा नितू परदेशी, युगधरा साळुंखे, रेखा कुळकर्णी, उषा परदेशी, संगीता पाटील, जितेंद्र चव्हाण, विजय बांदल, सुनील भारंबे, अश्विन सैंदाणे, स्वप्नील साखळीकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.




















