
जळगाव : प्रतिनिधी
मुक्ताईनगरातून तीन मोटार सायकल चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीनुसार राजीत फरान खाटीक (19) रा. सिटफॉर्म इदगाह नगर, मुक्ताईनगर, नवाब युसूफ शहा (20) रा. प्रतिभा नगर, वरणगाव व सलमान खान हमीद खान (28) रा.जुने गाव चांभार कॉलनी मागे, मुक्ताईनगर यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चोरीच्या दोन मोटार सायकलींपैकी एक मोटार सायकल मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीतून व दुसरी इच्छापूर ता. बुरहानपुर मध्य प्रदेश येथून चोरी केल्याचे दोघांनी कबुल केले आहे. दोन्ही ठिकाणी दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी दोघा गुन्हेगारांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, भगवान तुकाराम पाटील चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.




















