
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील संत गाडगेबाबा चौकात राहणाऱ्या मुलीस भेटण्यासाठी उत्तमराव नामदेव वाघ (वय 78) हे 30 जुलै रोजी रात्री आले होते. वाघ यांच्या मानेला चाकू लावून धाक दाखवला. त्यांच्या जवळील मोबाइल व 12 हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेल्याची घटना घडल्यानंतर ३१ रोजी फिर्याद दिल्यानंतर लागलीच. एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
रिक्षात फिरवून केली लूट
रेल्वेस्थानकावरुन ते एका रिक्षेत बसले. या रिक्षात आगोदर दोन जण बसले होते. रिक्षा इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून संत गाडगेबाबा चौक न जात थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात घेवून गेला. त्यावेळी तिन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून धाक दाखवला. त्यांच्या जवळील मोबाइल व 12 हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेले.
पोलिसांसोबत पाहणी करताच सापडले आरोपी
या प्रकरणी वाघ यांनी 31 जुलै रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, मुदस्सर काझी, किशोर पाटील, छगन तायडे यांनी वाघ यांन सोबत घेऊन संपूर्ण मार्गाची तपासणी केली. वाघ यांनी सांगीतल्यानुसार मार्गावरील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एका रिक्षेवर संशय बळावला. संबधित रिक्षा सराईत गुन्हेगार आकाश जोशी हा भाड्याने घेऊन चालवत असल्याची माहिती मिळताच पथकाने रविवारी आकाश अरुण जोशी व लक्ष्मण खेमचंद जोशी या दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.





















