
जळगाव : प्रतिनिधी
साहित्य रत्न, सम्राट,लोकशाहीर, कामगार नेते अण्णा भाऊ साठेंची आज जयंती शहरातील नेरी नाका परिसरात उत्साहात जळगावात साजरी करण्यात आली.
नेरी नाका येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी लोकशाहीर यांचा जयघोष करून त्याचे विचार याठिकणी मांडण्यात आले. यावेळी उपस्थित राज्यध्यक्ष बामसेफ सुमित्र अहिरे, अजय गरुड, सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे, बहुजन क्रांती मोर्चाचे शहर संयोजक सुनील देहडे, पंकज सोनवणे, भारत मुक्ति मोर्चाचे राहुल सोनवणे, भारत मुक्ती मोर्चाचे सुकलाल पेंढारकर, मंगेश अडकमोल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















