• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६ 

“मी मराठी बोलतो, मला मराठी समजते… या माझ्या रिक्षात बसा!” अशा ठळक संदेशाचे पोस्टर लावण्याचे अभियान आज भुसावळ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उत्साहात राबविण्यात आले. शहरातील रिक्षा चालकांच्या वाहनांवर हे पोस्टर लावून मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप-आधारित वाहतूक सेवा (ओला-उबेर) चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होऊन स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भुसावळमध्ये पुढाकार घेत जनजागृतीचा हा उपक्रम हाती घेतला. शहरातील विविध भागांत मनसे पदाधिकाऱ्यांनी चालकांशी संवाद साधत मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, भुसावळ शहरातील रिक्षाचालकांनीही या अभियानाचे मनापासून स्वागत केले. “होय, आम्ही मराठी बोलतो आणि आम्हाला मराठी बोलण्याचा अभिमान आहे,” अशा भावना व्यक्त करत अनेक चालकांनी आपल्या रिक्षांवर उत्साहाने पोस्टर लावून घेतले. काही ठिकाणी चालकांनी स्वतःहून पुढाकार घेत पोस्टर लावण्याची तयारी दर्शवली, यामुळे या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या प्रश्नावर ठाम व आक्रमक भूमिका घेत आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राज्यभर अशा प्रकारच्या उपक्रमांना वेग मिळत असून, मराठीचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

या अभियानामुळे केवळ शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणीच नव्हे, तर मराठी भाषेविषयी अभिमान आणि जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाशहराध्यक्ष दीपक कोळी, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group