
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी आज अचानक (सरप्राईज) पाहणी दौरा करत शहरातील विविध कामांचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान प्रभाग समिती क्र. २ (डाके वाडी) ची पाहणी करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या एस.डब्ल्यू.सी. राधाकृष्ण नगर येथील दवाखाना, मनपा स्व. नानीबाई अग्रवाल दवाखाना( गणेश वाडी ) व शिवाजी नगर येथील मनपा हॉस्पीटल ची पाहणी केली तसेच. यासोबतच शाहू नगर येथील जळगाव शहर मनपा उर्दू शाळा क्रमांक १२, मनपा शाळा क्रमांक ५ (पोलीस लाईन), मनपा शाळा क्रमांक ३८ (डाके वाडी), मनपा शाळा क्रमांक ११ व मनपा शाळा क्रमांक ३२ तसेच सुप्रीम कॉलनी येथील आरोग्य वर्धिनी केंद्र येथे भेट देऊन शैक्षणिक व मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली.
या भेटीत शहर अभियंता योगेश बोरोले, उपायुक्त पंकज गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी सुशांत निकुंभ तसेच वैद्यकीय अधिकारी स्वप्नील सोनवणे हे उपस्थित होते. सभापती चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित ठिकाणी स्वच्छता, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा व शैक्षणिक व्यवस्थेची सखोल पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
या अचानक पाहणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित विभागांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.





















