
जळगाव मिरर | ३ मे २०२६
चोपडा शहरातील पंकज नगर भागातील रहिवासी असलेल्या प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) यांचे १ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उत्तराखंड या ठिकाणी दुर्दैवी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ, गंगोत्री, यमोनोत्री येथील दर्शन झाल्यानंतर प्रतिभा बोरोले या बद्रीनाथसाठी रवाना घ्यायला त्रास जाणवू लागला होता. केदारनाथच्या झाल्या होत्या. दरम्यान, आदल्या रात्री त्यांना श्वास खाली चमोली येथे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १ मे रोजी सकाळी ८ वाजता त्यांचे निधन झाले. तर १ रोजी बद्रीनाथ मंदिरात त्या दर्शन घेणार होत्या. त्यांच्यासोबत चोपड्यातील एकूण १६ भाविक होते. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्या माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी तर पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या भावजाई अन् उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू तर मयूर बोरोले यांच्या मातोश्री होत.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी तत्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून वैद्यकीय व कागदपत्रांची पूर्तता केल्याने मृतदेह लवकर ताब्यात मिळण्यास मदत झाली. दरम्यान, मयत प्रतिभा बोरोले यांचा मृतदेह केदारनाथ येथील चमोलीपासून थेट चोपड्यापर्यंत रुग्णवाहिकेतून आणला. त्यानंतर त्यांच्यावर २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.





















