
वाकोद, ता.जामनेर : प्रतिनिधी
जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ दिनांक 2 रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान संशयित बोलेरो पिक अप गाडी आढळून आली असता तब्बल 24 तासानंतर पोलीसात गाडी चालक व् गाडी मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी मधून तब्बल १४ लक्ष ६० हजार रु किमतीचा अवैध गुटखा मुद्देमालासह पहूर पोलीस ईश्वर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. गाडी मधे ७ लाख ६८ हजार रु किमतीचा राजविलास गुटखा ते १ लक्ष ९२ हजार रु किंमतीचा जाफरानी जर्दा व् ५ लाख रु किमतीची बोलेरो पिक अप गाडी ऐसा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामागे मोठे रैकेट असण्याचा संशय आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान मंगळवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान पिंपळगांव पळसखेडा फाट्या जवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो गाड़ी क्र. (एम. एच. १९ सी. वाय. ६८८१) अडवून चौकशी केली असता चालक संशयास्पद वागणूक आढळून आली. गाड़ी काय माल आहे असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठलाग करती वाहतूक पोलिस ही मागे गाड़ी घेऊन निघाले बेदरकारपणे दोघांनी वाहने भर रस्त्यावर चालविल्याचे प्रत्येक्षदर्शीनी सांगितले.




















