आई हे नाव किती पवित्र असते. या पवित नावाला काळिमा फास नासणारी हृदयद्रावक घटना घडल्याने व्हिडीओ पाहून मन सुन्न करून जाते. एका अपार्टमेंटच्या बाल्कनीतून एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलीला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ती चार वर्षाची मुलगी जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक सुद्धा झालेली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बेंगळुरू येथे एका अपार्टमेंटच्या बाल्कनीतून एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलीला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना cctv मधी कैद झाली आहे. त्यात ती महिला आपल्याच मुलीला फेक्तांना दिसत आहे. मुलीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी उत्तर बेंगळुरूच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये ही भीषण घटना घडली. यावेळी चार वर्षाच्या मुलाच्या आईनेही उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला परंतु शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला अडविल्यामुळे तीचे प्राण वाचले आहे.
https://twitter.com/ians_india/status/1555474541815554050?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1555474541815554050%7Ctwgr%5E825cf02edbf40b2307953ab89036fd4696d1f7b6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokshahilive.com%2Fshocking-video-2%2F
पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांची मुलगी ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे महिला नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. ती महिला डेंटिस्ट आहे आणि तिचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, आम्ही आईच्या मानसिक आरोग्याबाबत सर्व बाजूंनी विचार करत आहोत.