• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मैत्री दिन स्पेशल : ठाकरे आणि राऊत यांची जाणून घ्या मैत्री?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2022
in राज्य, सामाजिक
0
मैत्री दिन स्पेशल : ठाकरे आणि राऊत यांची जाणून घ्या मैत्री?
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा उल्लेख केले जाणारे फायरब्रांड नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली. यानंतर चर्चा झाली ती राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची, त्यात केलेल्या संजय राऊत यांच्या उल्लेखाची. एका जाहीर सभेत ‘आज पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. असे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होत. पण विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्यामुळेच संजय राऊत शिवसेनेत आलेत. संजय राऊतांच बालपण माहिममध्ये गेलं. त्यांचे वडिल राजाराम राऊत हे JKW कंपनीत कामगार होते. आणि तिथले कामगार नेते देखील होते. कट्टर शिवसैनिक असणारे राजाराम राऊत हे बाळासाहेबांच्या देखील तितकेच जवळचे होते. त्यातूनच संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले.

आंबेडकर कॉलेजमधून B.com झालेल्या या मुलाला पोटापाण्याला लावायचं म्हणून बाळासाहेबांनीच संजय राऊतांना माधव गडकरींकडे पाठवलं होतं. शिवसेनेच्या शिफारसीवर आला म्हणून गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे. जागा नाही म्हणून संजय राऊतांना मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागलं. अशातच त्यांच्यावर जबाबदारी आली ती लोकप्रभेत लिहण्याची. संधी ओळखून संजय राऊतांनी क्राईम रिपोर्ट चालू केलं. त्या काळात म्हणजे १९८५ च्या सुमारास संजय राऊत क्राईम रिपोर्ट करु लागले. त्याचवेळी लोकसत्ता ला राज ठाकरे व्यंगचित्र काढत होते. राऊत लोकप्रभा ला क्राइम लिहायचे. समवयस्क असल्याने दोघांच्यात मैत्री झाली. राज ठाकरे त्यांना मातोश्री वर घेऊन गेले. आणि बाळासाहेबांना ओळख करुन दिली. दरम्यान, मराठीत एकतर क्राईम स्टोरी छापून येत नसतं किंवा त्यांच स्वरुप बातम्यांच्या स्वरुपात असे.पण संजय राऊतांनी आपली वेगळी शैली विकसीत केली. वेगवेगळ्या कवर स्टोरीमुळे लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला आणि संजय राऊत लोकांच्या नजरेत येवू लागले.

पण या सगळ्यात राऊतांवर खास नजर होती ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांना हा पोरगा काहीतरी करेल अस वाटायचं. क्राईम रिपोर्ट करता करता संजय राऊतांचा मोर्चा राजकिय रिपोर्टिंगकडे वळला. या संधीच सोनं करत आपल्या शब्दांनी लोकप्रभा गाजवू लागले. छगन भुजबळ, नारायण राणे हे बाळासाहेबांप्रमाणेच तोडीस तोड बोलायचे. पण प्रश्न होता तो बाळासाहेबांप्रमाणे लिहणाऱ्याचा. आपल्या शेलक्या शब्दात अचूक घाव घालणारा माणूस बाळासाहेबांकडे नव्हता. अशातच छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. छगन भुजबळांनी सेनेला राम राम ठोकताच लोकप्रभात कवर स्टोरी छापण्यात आली. ही कवर स्टोरी केली होती संजय राऊतांनी. संजय राऊतांची ती स्टोरी बाळासाहेबांच्या नजरेत आली बाळासाहेबांच्या लक्षात आलं. बाळासाहेबांनी २९ वर्षीय राऊतांना बोलावून त्यांना सामनाचं कार्यकारी संपादक केलं. राज ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरेंसोबत देखील त्यांचे त्याच ताकदीचे संबध प्रस्थापित झाले. संजय राऊत बाजूला न पडता त्यांच महत्त्व अधिक वाढत गेलं. अगदी राज ठाकरेंसोबत असणारे मैत्रीचे संबध लक्षात असून देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेत स्कोप दिला.

Related Posts

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group