जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२६
दुचाकीने घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात वरुण विजय सुरवाडे (रा. श्रावस्ती रेल्वे हॉस्पिटलच्या मागे, भुसावळ) हा तरुण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला होता. याप्रकरणी दि. २५ रोजी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील वरुण सुरवाडे व त्याचा मित्र पवन अडकमोल हे दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी (एमएच १९, ईआर ८४९३) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडे जात होते. महामार्गावरील ऑटोनगरकडून जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच २०, जीसी ९६८४) क्रमांकाच्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सुरवाडे हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र पवन अडकमोल हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, दि. २५ रोजी सागर दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिकअप वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जमीन शेख हे करीत आहे.



















