नवरा बायको मधील भांडण नेहमी सुरूच असते व हे भांडण काही तासात शांत हि होतेच. दरम्यान, अशीच एक नवरा बायकोच्या वादाची बातमी समोर येत आहे. ही घटना आहे राजस्थानच्या बिकानेर येथे घडली आहे. या घटनेत मात्र बायकोने नवऱ्याला क्रिकेटच्या बॅटने धु-धु धुतला आहे.
अगदी शुल्लक कराणाने हा वाद झाला आहे. बायकोने केलेले जेवण न खाताच नवरा झोपी गेल्याने बायकोने क्रिकेटच्या बॅटने नवऱ्याला मारले आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे. या घटनेत बायकोचा नवऱ्याला इतका मार बसला की तब्बल 15 टाके घालावे लागले आहेत. शिवाय झोपमोड झाली, ते वेगळंच! या घटनेत पत्नीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याउलट पीडित पती आणि त्याच्या कुटुंबीयांवरच पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे, अशी एकतर्फी कारवाई केल्याचं माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून नवऱ्याबाबत पतीबाबत लोकांना सहानुभूती वाटू लागली आहे.
आपला नवरा जेवण न करता झोपला याचा बायकोला प्रचंड राग आला होता. राग पत्नीच्या इतक्या डोक्यात गेला की आपल्या पतीलाच पत्नीने बॅटने अक्षरशः सोलपटून काढले आहे. मारहाण इतकी अमानुष होती की अर्धा डझनपेक्षा जास्त काटे जखमी पतीला लावावे लागले. इतक्यावरच पत्नी थांबली नाही, एकदा तिच्या हातातली बॅट शेजारच्यांनी कशीबशी करुन सोडवली. पण गरम डोक्याच्या पत्नीनं पुन्हा एकदा बॅट हिसकावून घेत पतीवर हल्लाबोल केला. एका खासगी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.