जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६
छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर व जळगाव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महानगराध्यक्षपदी मेहरूण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक उज्वल सुरेश पाटील, तर तालुकाध्यक्षपदी ममुराबाद येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक डॉ. राकेश एकनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हे यांनी जळगाव महानगर व जळगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
जळगाव महानगर कार्यकारिणी
महानगराध्यक्ष उज्वल पाटील, महानगर उपाध्यक्ष सतीश पाटील व संजय सांगळे, महानगर सचिव हितेंद्र टेकावडे, कायदेविषयक सल्लागार ॲड विक्रम महाले, तर सहसचिव नंदू बडगुजर, जयंत गोंधळी, चंद्रशेखर महाले व यशोदीप धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर कार्यकारिणीत सक्रिय सदस्य म्हणून मनोहर बडगुजर, कल्पेश वाणी, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराळे, भीमराव सोनवणे, आनंद महीरे, राजू कोळी व सागर कुटुंबळे यांचा समावेश आहे.
जळगाव तालुका कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष डॉ. राकेश पाटील, उपाध्यक्ष गणेश तायडे व डॉ. ललित कोतवाल, सचिव मयूर जावळे, तर सहसचिव आचल भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणीत सक्रिय सदस्य म्हणून डॉ. किरण तायडे, डॉ. विशाल साळुंखे, डॉ. निरज सोनवणे, सचिन पाटील, तन्मय राणे व निरंजन पाटील यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
लवकरच जळगाव जिल्हा कार्यकारिणीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या कार्यकारिणीही जाहीर करण्यात येणार असून, समाजकार्याची आवड असलेल्या तसेच जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची इच्छाशक्ती असलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी संघटनेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव महानगर व तालुका स्तरावर संघटनेचे कार्य अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.




















