जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२६
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेने तर्फे सलग ६व्या वर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नवीन बी.जे.मार्केट येथे करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६७ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी उत्तर महाराष्ट्राचे युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे, कार्तिक खैरनार, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, राहुल चव्हाण आदी युवासेना पदाधिकारी यांची मुख्य उपस्थिती होती.





















