चाळीसगाव : प्रतिनिधी
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खान्देश कुणबी मराठा समाजाच्या वतीने दिनांक 20 रोजी शहरातील करगाव रोडवरील गणपती मंदिर जवळ वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर संमेलनास प्रसिद्ध व्याख्याते पंकज रणदिवे यांची प्रमुख उपस्थित लाभली. सर्व प्रथम संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पंकज रणदिवे यांनी आपल्या व्याख्यानात मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठा समाजाच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणारा वार्षिक स्नेह संम्मेलन मेळावा हा खरोखर कौतुकास्पद असून यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. नवीन पिढीने यातून बोध घेऊन आपल्या धर्माची रक्षा करण्यासाठी समाजातील प्रत्येक तरुण पिढीने पुढे आले पाहिजे असे आव्हान करत ते पुढे म्हणाले की संत तुकाराम महाराज यांची आज सर्वत्र उत्साहात जयंती साजरी केली जात, त्यांचे विचार आणि आचार आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजे, त्यांचे अभंग आपल्याला माहित असले पाहिजे, त्यांच्या अभांगाने तुम्हा आम्हा सर्वांना लढण्याचं बळ आणि जगण्याची ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने संत तुकाराम महाराजांच्या आदर्श घेऊन जीवन जगले पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर खान्देश कुणबी मराठा समाजाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, ह.भ.प. कृष्णा महाराज, सुनीता ताई पाटील, व्याख्याते पंकज रणदिवे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. कृष्णा महाराज यांनी मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबाला पुढील वर्षी एक तुकाराम गाथा ही भेट देणार असल्याचे या कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला मराठा समाजातील बंधू आणि बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी समाज बांधवांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी युक्ता केशव पाटील यांनी केले तर आभार अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाना पाटील सर, केशव पाटील, योगेश जाधव, सचिन गायकवाड, संदिप जाधव, सुधीर पाटील, सचिन पाटील, प्रदीप मराठे, ईश्वर पवार, छोटू अहिरे, नंदु शिर्के यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.