जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिल महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे “गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन” करण्यात आले होते. यावेळी विदयार्थी – विदार्थीनी सहभाग घेतला होता.
किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनिल महाजन ज्युनिअर कॉलेज तर्फे दि १९ रोजी शाळेच्या परिसरात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांची वेशभूषा करून दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला उपस्थित महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनी बाळकृष्णांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. दहीहंडी च्या गीतांवर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पाटील समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले