जामनेर : करन साळुंके
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आज राज्यभर महागाईच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जामनेर शहरातील तहसील कार्यालयाबाहेर तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, विलास राजपूत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओक्के, हल्ला बोल्ल, हल्ला बोल्ल अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.
तहसीलदर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून जिवनावश्यक गोष्टीसाठी प्रचंड महागाई झालेली आहे. यामध्ये घरात रोज लागणाऱ्या वस्तु व खादयपदार्थ दाळीवर लावण्यात आलेला जीएसटी त्याच बरोबर गॅस, पेट्रोल, डिझेल, तसेच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली शेतीपयोगी खते व बियाणे यामुळे सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे आर्थिक बजट कोलमडले आहे व त्याचा परस्पर विरोधाभास म्हणजे देशातील जनतेचे प्रतिदिन उत्पन्न जैसे थे आहे. त्याच बरोबर देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी जामनेर तर्फे आम्ही सदर महागाईचा जाहीर निषेध करत असून याची दखल घेवून आमची विनंती केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी अशी विनंती केली आहे.
या आंदोलंत जितेश पाटील, विनोद माळी, अर्जुंत पाटील, संतोष झाल्टे, मोहन चौधरी, सचिन बोरसे, शे.सेइद.शे.चांद, सागर कुमावत, शाहाद शेख, हीमत राजपूत, अरविंद वाले, अहमद खान युनुस खान, गोकुळ नेमाडे, विजय धनगर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.