चोपडा : निखील पाटील
चार महिने झाले तरी केंद्र सरकारकडून वृद्धापकाळ पेन्शन योजना मानधनसाठी अनुदान न मिळालेले विधवा दिव्यांग शेतमजूर यांचे हाल होत आहेत याबाबत सविस्तर अशी की दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्रात चार योजनांद्वारे मानधन दिले जाते त्यात श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी योजना वर्धा पेन्शन योजना अंतर्गत मानधन दिले जाते त्यातील दोन योजना या राज्य सरकार पुरस्कृत असून त्यांना दोन महिन्यापासून महाराष्ट्रातील राजकीय राजकीय सत्ता च्या गोंधळात मानधन मिळालेले नाही व केंद्र सरकारच्या दोन योजना अंतर्गत तर चार महिन्यापासून मानधन मिळाले नाही त्यामुळे लाखो लोकांचे हाल होत आहेत.
याबाबत माहिती घेतली असता २ योजनेचे मानधन केंद्र सरकारकडून देण्यात येते. परंतु गेल्या चार महिन्यापासून त्याचे अनुदान आले नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हे मानधन मिळालेले नाही दुसरीकडे शिवतीर्थ मैदानावर यावर्षी दसऱ्याची सभा कोणाची होणार यावर चर्चा रंगवली जात आहे.
संजय गांधी शाखा चोपडा कार्यालयाचा कारभार नमुनेदार असाच आहे.उदाहरणार्थ.. नारद येथील सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस मंडाबाई भोई वय ६७ वर्षे या दोन वर्षापासून सेवानिवृत्त झाल्या त्यांना महाराष्ट्र शासनामार्फत पेन्शन लागू नाही परंतु सेवानिवृत्तांना ७५ हजार रुपये महाराष्ट्र सेवानिवृत्ती लाभ देते तो देखील श्रीमती भोई यांना मिळालेला नाही त्यांचे पती हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असून त्यांना जमीन नाही मुलबाळ नाही अशा स्थितीत त्यांच्यासमोर जीवन कसे जगावे ?हा प्रश्न निर्माण झालेला आहे.. दुसरीकडे पासून 21 पासून त्यांना वृद्धापकाळ योजनेचे पेन्शन मंजूर झाले आहे ते १४ महिणेपासून मिळालेले नाही.
या वयोवृत्तांना केंद्र सरकारचे मानधन त्वरित न मिळाल्यास लालबावटा शेतमजुर युनियन तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा लाल बावटा शेत मजूर युनियनचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य का अमृत महाजन यांनी एक जाहीर केलेल्या पत्रकात दिला आहे.