मेष : दाम्पत्य जीवनात आनंदाचा काळ आहे, नोकरीमध्ये प्रगती करण्याच्या संधी आहेत. मोठ्यांचे सल्ले घ्या.
वृषभ : कोणत्याही नात्यामध्ये कटुता आली असल्यास ती संवाद साधून मिटवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर ताबा ठेवा. मोठ्या भावाची साथ मिळणार आहे.
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचा. नोकरीच्या बाबतीत आज एखादी मोठी संधी तुमच्यापाशी चालून येणार आहे.
कर्क : संक्रमित आजारांपासून सावध राहा. आजचा दिवस शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
कन्या : आज एखादी नवी वास्तू खरेदी करत कुटुंबीयांना सुखद धक्का द्याल. सायंकाळपर्यंत ही शुभवार्ता सर्वांनाच कळेल.
तुला : कोणाशीही खोटं बोलू नका. नात्यांचा तिढा बोलून सोडवा. एखादी दिलासादायक बातमी मिळेल.
वृश्चिक : खाण्यापिण्याच्या वस्तू दान करा. अनिष्ठ गोष्टींपासून लांबच राहा. तुमचं आजारपण दूर होणार आहे.
धनु : व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास करण्याचा योग आहे. मित्रांची मनधरणी करण्याच्या नादात पडू नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.
मकर : कुटुंबात असणारे वाद मिटणार आहेत. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचा योग आहे.
कुंभ : अविवाहितांसाठी मनाजोगी स्थळं येणार आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. सकाळच्या वेळी बरीच कामं मार्गी लागतील.
मीन : कलाक्षेत्रात सक्रीय असणाऱ्यांना आज फायदा होणार आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. एखादं नवं घर खरेदी कराल.



















