मेष : अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आज मन प्रसन्न असेल. व्यापारात गुंतवणूक करा. नोकरी करण्यासाठी एखादी नवी संधी चालून येईल.
वृषभ : नोकरीच्या संधी मिळतील. जुन्या मित्रांना मिळण्यासाठी बेत आखाल. कोणाशीही वाद घालू नका.
मिथुन : आईवडिलांच्या आशीर्वादाने शुभ कामांची सुरुवात करा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आजची गुंतवणूक तुम्हाला फळणार आहे.
कर्क : दाम्पत्य जीवनात आनंदाचे आणि सुखावणारे क्षण येणार आहेत. नवं वाहन खरेदी कराल. मानसन्मान वाढेल. कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचे बेस आखाल.
सिंह : संध्याकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळेल. अविस्मरणीय आणि आश्चर्यकरक घटनेनं तुम्हीही थक्क व्हाल. अडकलेले पैसे परत मिळतील.
कन्या : तुमच्या कामावर लक्ष द्या. अचानक एखादी इजा होऊ शकते. जोडीदारासोबत निवांत क्षण व्यतीत करा.
तुळ : नवी भेट मिळणार आहे. संतानसुख मिळणार आहे. पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज गोड बातमी मिळणार आहे. कुटुंबात विनाकारण वाद घालू नका.
वृश्चिक : परदेशात प्रवास करण्याचा योग आहे. आज जवळच्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करा. रागावर नियंत्रण ठेवा.
धनु : आज तुमचे सर्व प्रयत्न ठरणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे. नोकरी बदलण्याचा विचार कराल. खर्च आणि अर्थार्जन दोन्ही वाढेल.
मकर : आज कुटुंबीयांना वेळ द्या, त्यातूनच अर्ध्या अडचणी दूर होणार आहेत. नात्यांमध्ये असणारी कटुता संपणार आहे.
कुंभ : अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. नोकरीतील समस्या दूर होतील. आई- वडिलांमध्ये असणारे वाद मिटतील.
मीन : मोठ्यांचा आदर करा. वाहन लक्षपूर्वक चालवा. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता दूर करण्यावर भर द्या.



















