
जळगाव मिरर | ११ जुलै २०२४
तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फसू लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या वडीलांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि अलियार खान हे करीत आहे.





















