जळगाव मिरर । २९ सप्टेंबर २०२३
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी दि.25 रोजी रात्रीच्या सुमारास घरातील सदस्य सर्व झोपून गेल्यावर रात्रीच्या सुमारास कुणीतरी या मुलीला पळवून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी मेहुणबारे पोलिसात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.योगेश मांडोळे हे पुढील तपास करीत आहेत.




















