
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका २० वर्षीय तरुणाने रात्री गळफास घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी जवळ असलेल्या पोलीस कॉलनीतील रहिवासी असलेला सलमान खान गफार खान (वय २०) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. गुरूवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून झोपला. मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी येत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी करीत आहे.





















