
जळगाव मिरर | १९ मार्च २०२६
शहरातील रामेश्वर कॉलनीतील रामदेवबाबा मंदिरासमोर राहणाऱ्या संदीप भटू चव्हाण (वय २१, मूळ रा. देव्हारी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) या तरुणाने नातेवाईकांच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १७ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरातील सोयगाव येथे राहणारा संदीप चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून जळगावातील रामेश्वर कॉलनीतील रामदेवबाबा मंदिरासमोर स्थायिक झाले आहे. दि. १७ मार्च रोजी संदीप याने नातेवाईकांच्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच संदीप याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. संदीपच्या आत्म्हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे




















