जळगाव मिरर | ११ मे २०२४
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २२ वर्षीय तरुणी रेल्वेलाईन ओलांडत असताना नागपूरकडून येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तासखेडा येथील मूळ राहणारी स्वाती भीमराव तायडे (वय २२) ही तरुणी सध्या वरणगाव येथील वामन नगरमध्ये राहते. ही तरुणी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्थानकाच्या काही अतरांवर रेल्वेलाईन ओलांडत होती. या वेळी नागरपूरकडून येणारी रेल्वे (गाडी क्रंमाक ००१४१) ची त्या तरुणीला जबर धडक बसली. या दुर्दैवी अपघातात स्वाती तायडे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास भुसावळ लोहमार्गचे पीएसआय प्रवीण निकाळजे, पो.हे.कॉ. एस. ए. जाधव, किशोर कांडेले करत आहेत.