
जळगाव मिरर । २७ डिसेंबर २०२२
पारोळा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आम्हीच दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पारोळ्या तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेली बावीस वर्षीय तरुणीला संशयित आरोपी मिलिंद सुभाष देवरे यांनी दिनांक ९ डिसेंबर २०२२ पासून तर आजपर्यंत वारंवार लग्नाचे आम्हीच देत युवतीला मंगळसूत्र घालून सेल्फी फोटो घेतला होता. त्यानंतर तरुणीला सांगितले की मी माझ्या बायकोला फारकती देऊन तुझ्याशी लग्न करेल व तरुणीला प्रेम करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीचा साखरपुडा असल्याने त्या ठिकाणी जात तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत व तरुणीस सेल्फी असलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल करीत तुझे लग्न होऊ देणार नाही असा दम भरत तिला जीवेठार मारण्याची धमकी देत व तिच्या घरासमोर येऊन तिचा हात पकडून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने संशयित आरोपी मिलिंद सुभाष देवरे यांच्या विरोधात पारोळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेको सुधीर चौधरी हे करीत आहे.




















