जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यात अनेक शहरात होणाऱ्या अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना भुसावळ शहरात देखील एका २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात २३ वर्षीय तरूणी वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिची ओळख उमेर शेख मोहसीन शेख यांच्याशी झाली होती. त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. दरम्यान अत्याचार करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी उमेर शेख मोहसीन शेख याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.




















