जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
रस्ता ओलांडत असताना भरधाव बसच्या धडकेत रस्ता ओलांडणारा मयाराम फुलसिंग बारेला (वय २५, रा. सुनसगाव, ता. जामनेर) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथे मयाराम बारेला हा तरुण वास्तव्यास होता. मयाराम बारेला हे उमाळा येथे रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरून ते खाली उतरले. त्याचवेळी जळगावकडे येणाऱ्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.