जळगाव मिरर | ४ मे २०२४
यावल तालुक्यातील पिंपरूड येथील एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २ मे रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरुड येथील डॉ. आंबेडकर नगरमध्ये राहणारा दिनेश शांताराम सुरवाडे (वय २५) या अविवाहित तरुणाने २ मे रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरातील छताच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या बाबत मयत दिनेश सुरवाडेचा लहान भाऊ चेतन शांताराम सुरवाडे यांच्या माहितीवरुन फैजपूर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या तरूणाने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. मयत दिनेश सुरवाडे याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा तपास स.पो.नि. नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार रशीद तडवी करत आहेत.