जळगाव मिरर / २५ नोव्हेंबर २०२२
जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते मोहाडी फाट्याकडे जाणारा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना या रस्त्यावर वाहतूक करणे सुद्धा धोकादायक झाले होते.
सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मालकीचा असून यासंदर्भात जळगाव शहराचे आमदार श्री.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केलेली होते व आमदार श्री.सुरेश भोळे यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. यावर ना.गिरीष महाजन आणि ना.गुलाबरावजी पाटील यांचे सहकार्य लाभले. आज २५ रोजी आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज जाणाऱ्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत १००० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निर्णयाबाबत मंत्री महोदयांचे आ.सुरेश भोळे यांनी आभार मानले आहे
