
जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३
राज्यातील बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे. त्यामुळे वेळत बदल झाला आहे. याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे.
त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता, निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.
जाणून घ्या परीक्षेची सुधारित वेळ
सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत
काळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत
सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत
दुपारच्या सत्रातील सुधारित वेळापत्रक
दुपारी 3 ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत
दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत
दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत





















