
जळगाव मिरर | ३ जून २०२३
शहरातील टॉवर चौकातील एका दुकानाच्या समोर लावलेले दुचाकी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील रिंग रोड परिसरातील शंकरवाडी येथील रहिवासी ललित भास्कर चौधरी (वय ५०) हे दिनांक २ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक परिसरातील एका दुकानाच्या समोर दुचाकी क्रमांक एम.एच.१९.ए.पी.७९२५ हि गाडी पार्किंग करून आपल्या कामानिमित्त गेले असता या ठिकाणाहून अनोळखी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली आहे. या प्रकरणी त्यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहे