
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका व्यापाऱ्याची फटक्यांची ऑर्डर घेवुन त्याच्याकडून स्टेट बँकेच्या एका बनावट खात्यावर पैसे भरण्यास सांगून तब्बल २,४१,५००/- रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञातविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील आकाशवाणी चौफुली, सागर पार्क रामदास कॉलनीतील रहिवासी असलेले धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८) व्यवसाय – व्यापार यांना २० ते २७ ऑगस्ट दरम्यान एका व्हॉटसअॅप नं. ८०९७६६७०३५ यावरुन शेखर माखीजा फटाके डिलर या नावाचा वापर करुन कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचेशी संपर्क करुन त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांचेकडून फटक्यांची ऑर्डर घेवुन त्यापोटी २,४१,५००/- रुपये चेकद्वारे एका बँकेत एका अनोळखीच्या खात्यात भरण्यास सांगुन फटक्यांची ऑर्डर घेवुन दिलेल्या मुदतीत फटाके न पाठविता व पैशांची मागणी केली असता ते दिले नाही म्हणुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली म्हणुन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहे.






















