
जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
अमळनेर शहरातील एका परिसरातील घराच्या बाहेर लावलेली दुचाकी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील सोनार चाळ कचेरी रोड परिसरातील रहिवासी किरण प्रकाश लोहार यांच्या घराबाहेरून दुचाकी क्रमांक एम.एच.१९ बीके ३६३३ या क्रमांकाची ८ हजार रुपये किमतीची लॉक अवस्थेत असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोना.कैलास पवार हे करीत आहे.




















