
जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित व्यक्ती पोलिस स्थानकात दाखल झाले त्यानंतर आ.चव्हाण देखील पोलीस स्थानकात पोहोचले होते मात्र रात्री उशिरा पर्यंत ते आज दि.३० ऑगस्ट २०२५ दुपारपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व पोलीस विभागात विविध चर्चेला उधाण आले आहे.
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची कॉल रेकॉर्डिंग ऐकून दाखवली होती. त्यानंतर आ.मंगेश चव्हाण चांगलेच आक्रमक झाले होते. तात्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याचे यावेळी सभागृहात आदेश देखील झाले. दुपारी चार वाजता आ.चव्हाण यांनी नियोजन समिती कार्यालयाच्या बाहेर येत माध्यमांना मुलाखत देखील दिली.
त्यावेळी देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर थेट सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आ.चव्हाण पोलीस स्थानकात पोहोचली व त्या ठिकाणी ठाण मांडून होते जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, अशी देखील भूमिका त्यांनी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घेतली होती. मात्र काही वेळात एमआयडीसी पोलीस स्थानकाची बत्ती गुल झाली आणि आ.चव्हाण गुन्हा दाखल होण्याआधीच तेथून बाहेर पडले. या प्रकरणात आज दुपारी दोन वाजेपर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय व पोलीस विभागात विविध चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यावर गुन्हा दाखल होतो की प्रकरण शांततेत मिटले जाते हे लवकरच समजणार आहे याचीच वाट बघूया.




















