जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक विभागात एसीबीने लाच घेताना अधिकारी व कर्मचारी यांना अटक केली असतांना नुकतेच जळगाव शहरात प्रशांत विकास जगताप (वय ३३), (व्यवसाय – कंत्राटी वायरमन) याने तब्बल १ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक – श्री.सुहास देशमुख, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील , पोना. सुनिल वानखेडे,पो.ना. बाळू मराठे ,पोशी. राकेश दुसाने पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांनी ही कारवाई केली आहे.