जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४
चोपडा येथे लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन स्वाधार संघ अमळनेर, आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर, विधी सेवा प्राधिकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चा सत्राचा मुख्य उद्देश
१९ मे २०२२ रोजी भारताच्या मा. सुप्रीम कोर्टाने लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबत निर्देश जारी केले आहेत. सर्व सेक्स वर्कर्स ना संविधानानुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येइल या विषयी सुप्रीम कोर्ट पॅनलने न्यायालयाला तपशिलवार शिफारसी केल्या आहेत. सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमात चोपडा कोर्टाचे माननीय न्यायमूर्ती, विधी सेवा प्राधिकरण वकील प्रतिनिधी, चोपडा शहरातील पोलिस अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी व लैंगिक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
या चर्चा सत्राचे अध्यक्ष म्हणुन चोपडा न्यायालयाचे न्यायाधीश मा. आर. बी. राऊत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. चोपडा तहसीलदार भाऊसाहेब दादाजी थोरात, चोपडा शहराचे पोलीस निरीक्षक एम. डी. साळवे, अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,तसेच चोपडा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी महादेव तसेच आधार संस्थेच्या अध्यक्ष मा डॉ. भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, उपस्थित होते .
आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानी सेक्स वर्कर महिलासाठी आधार संस्था मागील २५ वर्षा पासून करत असलेल्या कामाची ओळख करून दिली. यानंतर आलेले वकील प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले. यांनी सेक्स वर्कस महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुप्रीम कोर्टाने दिलेले दिशा निर्देश, त्यावर आपण अजून काय सूचना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला. तसेच १९ मे रोजी सर्वाच्या न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना या बाबतित सविस्तर मांडणी केली. त्यानंतर मा एम.डी. साळवे पोलिस लैंगिक कामगार महिलाना येणाऱ्या अडचणी समजुन घेतल्या सेक्स वर्कर महिलांना होणाऱ्या पोलीस कार्यवाहीत यापुढे आम्ही या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न करू असे सागितले.
पोलिस निरीक्षक व उपस्थित तहसीलदार न्यायाधीशांना वारंवार होणाऱ्या रेड होणार्या समस्यां बद्दल मंगल ताई व गुड्डी ठाकूर यांनी सोबत घडलेले प्रसंग सांगितले. नॅशनल नेटवर्क सेक्स वर्क कामाबद्दल फरिदा काझी या भगिनींनी माहिती दिली.यानंतर चर्चासत्र खुले केले गेले.
भाऊसाहेब थोरात ,तहसिलदार चोपडा यांनी सांगितले की महिलांना शासनाच्या सर्व योजना आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत मागील महिन्यात महिलांचे रेशन सुरू करण्याचे काम देखील आम्ही केले आहे. महिलांना लाडके बहिणी योजना देखील लाभ आम्ही मिळून देत आहोत. व आता जागा व पाण्याच्या प्रश्न देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असे तहसीलदार साहेब यांनी सांगितले .
याप्रसंगीअँड. रणछोड पाटील. . राजेंद्र ठाकूर क. लिपिक निधी सेवा आयोग समिती ,
अँड हनीलाल पाटील, एस. एस. मराठे ,व्ही बी बैसाने, डॉ विशाल नेवे वैद्यकीय अधिकारी, श्रीमती जेडी शिरसाठ पर्यवेक्षक ,बाल विकास प्रकल्प, तृप्ती एस कुसुंबीवाल ,संजय पाटील, पंकज पाटील, प्रकाश मधुकर ठाकरे , संतोष पारधी ,पोलीस कॉन्स्टेबल,उमेश तळेकर महसूल शाखा चोपडा हे सर्व मान्यवर चर्चा सत्रात उपस्थित होते.
मा. आर .बी. राऊत सर जज साहेब, चोपडा विधि सेवा प्राधिकरण यांनी अध्यक्षीय मनोगतात विधी सेवा मार्फत सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व सेक्स वर्कर महिला च्या बाबतीत असलेल्या कायदयांची अंमलबजावणी करत असतांना मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन कसे करावे, व महिलांनी जास्तीत जास्त प्रशिक्षण व माहिती घेऊन सक्षम व्हावे असे आवाहन केले. सदर चर्चा सत्रामध्ये सुमारे 45 लैंगिक कामगार भगिनी उपस्थित होते. मान्यवरांनी चर्चासत्रात आपले मते व दृष्टिक्षेप टाकून सकारात्मक चर्चा घडवुन आणली. सदर चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता आधार बहुउद्देशिय संस्था, स्वाधार महिला संघ चे प्रतिनिधी राकेश महाजन, मुरलीधर बिरारी, दीपक विश्वेश्वर, यास्मिन शेख, तोसीब शेख, कल्पना पाटील, हितेंद्र माळी, ज्ञानेश्वर सोनवणे या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आधार संस्थेचे दिपक संदानशिव यांनी केले विधी सेवा समिती चोपडा चे आर. आर .ठाकूर.यांनी आभार प्रदर्शन केले.