
जळगाव मिरर । ४ फेब्रुवारी २०२३।
पारोळा शहरातून एका परिसरात असलेल्या डॉक्टराच्या घरातून भरदिवसा तब्बल २ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी असलेले डॉ.संकेत कुमार खरे (वय ३१) यांचे दि ३ रोजीच्या भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करीत चोरट्यांनी घराच्या बेडरूम मधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडत घरातील १ लाख रुपयाची रोकड तर १ लाख रुपयाचे वेगवेगळे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आल्यानंतर डॉ.खरे यांनी पारोळा पोलीसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी.गंभीर शिंदे हे करीत आहेत.




















