जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२३
देशभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असतांना अत्यंत वाईट घटना समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकाराच्या लेकीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. संगीतकार, अभिनेता आणि निर्माता अशा तिन्ही भुमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विजय एंटोनी याची मुलगी मीरा हिनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.
चेन्नई येथील राहत्या घरात मीराने तिच्या बेडरूममध्ये स्वत:ला पंख्याला लटकवत आत्महत्या केली. मीरा फक्त 16 वर्षांची होती. मीराच्या जाण्यानं विजय आणि त्याच्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खोलीत मीराला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मीरा ही अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यावर उपचार देखील सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे.हेही खायला घरात नव्हता अन्नाचा कण, उपासमारीमुळे जावं लागलं रूग्णालयात, आज आहे ‘हा’ अभिनेता कोट्याधीशविजय आणि त्याच्या कुटुंबाला 16 वर्षांच्या लेकीला गमावल्यानं खूप मोठा धक्का बसला आहे. मध्यरात्री 3वाजता सगळे झोपेत असताना मीराने चेन्नईमधील त्यांच्या अलवरपेट येथे असलेल्या घरात आत्महत्या केली. 16 वर्षांची मीरा चेन्नईमधील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती.
मागील काही दिवसांपासून ती डिप्रेशनचा सामना करत होती.अभिनेता विजय सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. ‘रथम’ हा त्याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच नुकतीच त्याची चेन्नईमध्ये एक मोठी कॉन्सर्ट झाली. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. विजय हा तमिळ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध म्युझिक कंपोझर आणि गायक म्हणून अनेक वर्ष काम करतोय. त्याचप्रमाणे त्यानं अभिनय, निर्माता आणि एडिटर, ऑडिओ इंजिनीअर सारख्या क्षेत्रातही नाव कमावलं आहे.