जळगाव मिरर | ३ जून २०२३
गेल्या काही दिवसापासून राज्यातील ठाकरे गटाचे नेते व शिंदे गटातील काही आमदारांमध्ये जोरदार वाक्ययुद्ध सुरु आहे. यात आता शिंदे गटाचे आ.संजय शिरसाठ यांनी थेट संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. संजय राऊतांपासून एका महिलेला मूल झालेले आहे, तसेच, याबाबत माझ्याकडे व्हिडिओदेखील आहे. काही दिवसांत हे प्रकरण समोर येईल, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट व खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेत संजय राऊत थुंकले होते. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला असून संजय राऊतांना घेरण्याची रणनिती शिंदे गट आखत असल्याचे दिसत आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. त्यानंतर राऊतांवर गंभीर आरोप करताना संजय शिरसाट म्हणाले, राऊतांना आता फक्त बोलून चालणार नाही. करून दाखवावे लागणार आहे. संजय राऊतांना एका महिलेपासून मुल आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. हे प्रकरण लवकरच समोर आणणार आहे.
संजय शिरसाट म्हणाले, ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ इच्छित नाही. मात्र, हे प्रकरण जगजाहीर आहे. संजय राऊतांनी या महिलेला अश्लील शिवीगाळ केली होती. ती क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. माझ्याकडेही ती क्लीप आहे.
संजय शिरसाट म्हणाले, याशिवाय मंगळवारी मी पत्रा चाळींचे सर्वेक्षणही करणार आहे. संजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे. या प्रकरणांचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगा जातील.
संजय शिरसाट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी उद्धव ठाकरे व संजय राऊतांनीच केली आहे. मविआ सरकार असताना अडीच वर्षे त्यांनी काहीच केले नाही. आम्ही ती चूक दुरुस्त केली तर आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच काम राहीलेले नाही. संजय राऊत हे गाडीखाली असलेल्या कुत्र्यासारखे आहेत. त्यांना वाटते गाडी आपणच चालवतो. पण, तसे नसते.