जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
मागील भांडणाच्या कारणावरुन सहा जणांच्या टोळक्याने दिनेश विजय कांबळे (वय २७, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्यासह दोन मित्रांवर सशस्त्र हल्ला केला. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ घडली. यामध्ये तिघे गंभीरजखमी झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील हनुमान नगरात दिनेश विजय कांबळे हा तरुण वास्तव्यास आहे. जून्या वादातून दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ रोहीत शिंदे, बब्या यादव, हीतेश झोनवल, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, कुणाला पाटील या टोळके त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात धारदार चाकू सारखे तिष्ण हत्यार होते, त्यांनी दिनेश कांबळे यांच्यासह त्याच्या दोघ मित्रांवर हल्ला केला. यामध्ये त्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले.
टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्यानंतर त्यांनी तिघांना शिवीगाळ करीत तुम्ही येथे पुन्हा आल्यास तुम्हाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या हल्ल्यात दिनेश कांबळे, अर्जुन रविंद्र महाजन व निर्मल विनोद पाटील (तिघ रा. हनुमान नगर) हे गंभीर जखमी झाले. जखमी दिनेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित रोहीत शिंदे, हर्षल पाटील, कुणाल पाटील (तिघ रा. हनुमान नगर), हितेश झोनवाल, बब्या यादव, ज्ञानेश्वर पाटील (तिघ रा. अयोध्या नगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.