जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना जळगाव शहरात देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू होता ज्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली होती तेव्हा शहरात विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोड नजीक असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागण्याची घटना घडली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल साठे यांच्या लक्षात येताच त्यांनी महानगरपालिकेचे बंब बोलवून ही आग आटोक्यात आणली आहे त्यामुळे मोठे नुकसान होण्यापासून वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या पार्किंग शेडमध्ये दिनांक ६ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या ठिकाणी मिशन आगीची घटना घडली यावेळेस सामाजिक कार्यकर्ते अनिल साठे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंब पाचारण करीत आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे पेट्रोल पंप व मागील परिसरात असलेल्या घरांना कुठलेही नुकसान झाले नाही.
जागा मालकाचे दुर्लक्ष !
जळगाव शहरातील दूध फेडरेशन रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला एक शेड बनवला आहे या ठिकाणी अनेक मोठे वाहन पार्किंग करण्यात येत असतात. ही जागा एका कंपनीची असल्याचे रात्री चर्चा होतील मात्र सकाळी त्या कंपनी चालकाला विचारले असता त्यांनी ती जागा आमची नाही असे सांगितले. मात्र ही आग जर मोठ्या प्रमाणात लागली असती तर बाजूला असलेल्या पेट्रोल पंप व त्यामागील असलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले असते त्यामुळे ही आग थोड्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यावर नियंत्रण मिळवता आले मात्र जर मोठी आग असतील तर यावर नियंत्रण मिळवता आले नसते. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी या शेडच्या मालकाने तत्काळ काहीतरी उपाययोजना कराव्यात.
घटना सीसीटीव्हीत दाखल
दूध फेडरेशन जवळील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या या शेडमध्ये दोन सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे याच ठिकाणी आग लागल्याने या सीसीटीव्ही मध्ये आगीची घटना कैद झाली आहे त्यामुळे ही आग लावली कुणी किंवा अचानक लागली असेल तर भविष्यात मोठा संकट येऊ शकतो हे देखील तितकच खरे आहे.